जळगाव प्रतिनिधी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या भोसरी प्रकरणाची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी होणार आहे. याच प्रकरणावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारवर ईडी कायम आहे. चौकशीत त्यात स्पष्टता येईल आणि कोण स्वच्छ आहे, कोणाचे हात बरबटले आहेत, ते सुध्दा समोर येईल, असे महाजन यांनी सांगितले.भोसरी प्रकरणात प्रचंड अनियमितता आहे, त्यामुळं खडसेंची जेलवारी अटळ आहे.मध्यंतरी या प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी केली होती.एवढंच नाहीतर खडसेंचे जावाई गिरीश चौधरी यांना अटकही करण्यात आली होती.
भोसरी प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी हे जेलमध्ये आहेत, त्यांना जामीन मिळाला नाही. बोगस कंपन्या स्थापन करून यांनी पैसा वळवला आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केली. तीन कोटी 75 लाख रुपयांना जमिनीची खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद आहे.