Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम
    जळगाव

    जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 19, 2026Updated:August 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक छायाचित्रण दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) मलाबार गोल्ड अँड डायमंड्स आणि प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ तसेच सर्व वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा स्नेहमयी वातावरणात भव्य सत्कार व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि कॅमेरा पूजनाने झाली. याच औचित्याने मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या नवीन डायमंड दागिन्यांचे लॉन्चिंगही करण्यात आले.

    व्यासपीठावर शहराच्या महापौर दीपमाला काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, स्टोअर मॅनेजर प्रियंका पाटील, सुजित नायर आणि प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधीपाल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

    “छायाचित्रकार हे समाजाचे डोळे” – महापौर दीपमाला काळे
    आपले मनोगत व्यक्त करताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “छायाचित्रकार हे समाजाचे डोळे आहेत. समाजात घडणारे सत्य आणि वास्तव आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचे अत्यंत जबाबदारीचे व महत्त्वपूर्ण कार्य तुम्ही करत आहात.”

    फोटोग्राफीमध्ये ‘एथिक्स’ महत्त्वाचे – एसपी श्रीकांत धिवरे
    जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आपल्या भाषणात स्वतःच्या फोटोग्राफीच्या आवडीला उजाळा दिला. त्यांनी या क्षेत्रातील आपले वैयक्तिक अनुभव सांगतानाच, “फोटोग्राफी करत असताना पत्रकारितेची आणि छायाचित्रणाची नैतिक मूल्ये (एथिक्स) जपणे अत्यंत आवश्यक आहे,” असे आवर्जून नमूद केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत पाटील, अभिजीत पाटील, प्रकाश लिंगायत, अरुण इंगळे, जुगल पाटील, पांडुरंग महाले व सचिन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला जळगाव शहरातील आजी-माजी वृत्तपत्र छायाचित्रकार आणि डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    रावेर लोकसभेत राष्ट्रवादीची नवी टीम; हाजी अनवर खाटीक यांच्यावर मोठी जबाबदारी

    August 16, 2026

    मोठी बातमी : वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा: दोन महिला व एक पुरुष ताब्यात

    August 13, 2026

    मेहरूण तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडवर; १६ ड्रेनेजचा प्रश्न निकाली काढणार

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.