शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक घरी दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. आज ईडीचं पथक थेट संजय राऊत यांच्या घरी पोहचलं आहे.
ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. दिवस ईडी कार्यालयाकडून हजर राहण्यासाठी वारंवार नोटीसा येऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा शहाणपणा शेवटी त्यांच्याच अंगलट आला आहे. या पथकासोबत सुरक्षा रक्षक असून त्यांनी संजय राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला आहे. कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संजय राऊत हे सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत घरी आहेत. अनेक प्रकरणांमध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने दोनदा संजय राऊत यांना समन्स बजावलं होतं.
पत्राचाळ प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी केली जाऊ शकते. संपत्तीच्या स्त्रोताबद्दलही त्यांना अनेकदा विचारण्यात आले होते. राऊत आणि कुटुंबीय सध्या घरीच आहेत.ईप्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली आहे. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.



