संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यावर ईडीने छापा टाकला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शिवसेनेला पुन्ह अडचणीत वाढ झाली. अश्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर चर्चा करत अर्जुन खोतकरांना सवाल विचारला आहे.
अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?”, असं टोला रामदास कदम यांनी लगावला आहे. तसे चइच्छा नसताना शिंदेगटात जावं लागतंय, असल्याचे अर्जुन खोतकर यांनी आपली झालेली कोंडी बोलून दाखवली. कदम त्याबाबत विचारलं आसता सर्वात आधी खोतकरांनी मला फोन केला होता, पण मला असं काही बोलेल नाहीत. हा एवढा घाबरट कधीपासून झाला हा, म्हणजे त्याने खाल्लेत का पैसे? अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?, म्हणालेत.
शिवसेनाचा मुख्यमंत्री असतानाही सर्वात कमी निधी हा सेनेच्या आमदारांनाच होता. जर शिवसेनेबद्दल एवढे प्रेम होते तर आमदारांवर अन्याय होताना त्यांनी आपली रोखठोक भूमिका का मांडली नाही. ते शिवसेनेचे नेते असले तरी त्यांनी कायम राष्ट्रवादीचे हित जोपासण्याचा प्रयत्न केल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे.