मुंबईत बोलाताना पेडणेकर यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आज मुंबईत बोलाताना त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आमच्या महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे खडे बोल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्यपाल कोश्यारींना सुनावले आहेत. तर पाठींबा देणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला.
नितेश राणेंच्या वक्तव्यावर पेडणेकर म्हणाल्या, जेव्हा नितेश राणे गोधडीत होते तेव्हा त्यांचे वडीलजीएसटीचे चेअरमन होते. इतिहास तपासा, आणि मग बोला असे म्हणत त्यांनी राणेंना फटकारले आहे. राणे पिता-पुत्र ज्या पक्षात जातात त्यांची सुपारी वाजवतात. आधी कॉंग्रसेशी पटलं नाही आणि आता भाजपची सुपारी वाजवतं आहेत. त्यामुळे, सुपारी फॅमिली म्हणून यांच्याकडून कोणता आदर्श घ्यायचा?, असा सवालही पेडणेकर यांनी केला आहे.राज्यपाल हे सातत्यानं काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत असतात त्यामुळे आता ते जगात प्रसिद्ध झाले आहेत, असा टोमणाही पेडणेकरांनी मारला आहे.
पुढे पेडणेकरांनी बोलताना मनसेचं गुण गायले आहेत. मुंबईचा विकास हा सर्वांनी केला आहे. आताचे सर्व उद्योगपती त्यात किर्लोस्करही होते. राज्यपाल हे स्वतःच्या कामाची दाखल न घेता इतरांची जास्त दखल घेत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.मनसे हा पक्ष कसाही वेगळा झाला असला तरी मराठी न्याय हक्कासाठी आणि हिंदुंसाठी नेहमी ठामपणे उभे आहे. राज्यपालांना हे कळायला पाहिजे की महाराष्ट्राचे राज्यपाल आहात मात्र त्यांना मराठीचा विसर पडत आहे.