जळगाव प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईमध्ये केलेल्या वक्तव्यावर आता विरोधकांकडून राज्यपालांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी म्हणत त्यांनी राजीनामा घ्या अशीही मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘मराठी माणसाला डिवचू नका!’ असे ट्विट केले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शुक्रवारी (२९ जुलै) रोजी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, ‘ गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’. या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. जय महाराष्ट्र ! असे ट्विट केले आहे.