पक्ष संघटन महत्वाचे; पक्षादेश आल्यास विचार करू- सुरेशनाना चौधरी
धरणगाव प्रतिनिधी । बंडखोरीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. धरणगाव शहराचे माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे जळगाव लोकसभेसाठी आगामी उमेदवार होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. पडतीच्या काळात आपण पक्षासोबत असून पक्ष बांधणीला अधिक प्राधान्य दिल, पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढू अशी प्रतिक्रिया सुरेश चौधरी यांनी दिली.
जळगाव लोकसभा मतदार संघात सध्या राजकीय वातावरणात मोठे बदल झाले आहे. शिंदे गट आणि शिवसेना अशी दरार निर्माण झाली आहे. एकीकडे अडचणीत सापडलेल्या शिवसेना पक्षासाठी मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे. दुसरीकडे शहरातील उद्योगपती तथा माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे लोकसभेसाठी संभव्य उमेदवार ठरू शकतात अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे. सुरेशनाना यांना नागरीकांकडून चांगले समर्थन मिळत आहे. यासंदर्भात “लाईव्ह महाराष्ट्र”ने संपर्क साधला असता त्यावर त्यांनी प्रतिक्रीया दिली की, सध्या शिवसेना पक्ष संकटात आहे. त्यामुळे पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या आमच्या समोर पक्ष संघटना हे महत्वाचे आहे. लोकसभा निवडणूक अजून लांब आहे. पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत नक्की विचार करून अशी त्यांनी सांगितले. लोकांकडून चांगले समर्थन मिळत असले तर आपण त्यांच्यामुळेच नगराध्यक्षपदापर्यंत गेलो असे देखील श्री. सुरेशनाना चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या विधानपरिषद निवडणुकीतही सुरेशनाना चौधरी यांनी पक्षादेश मान्य करत आपली उमेदवारी मागे घेतली होती. आता सध्या जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेकडून सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच धर्तीवर सुरेशनाना चौधरी यांची जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी मतदार संघातून केली जात आहे.