जळगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकार कोसळले. या बंडातील सर्व आमदारांनसह खासदारांनी हिंदुत्वाचं कारण देत शिंदे गटात सामील झाल्याचं म्हटलं होतं. बंडखोरांमध्ये तत्कालीन ठाकरे सरकरमधील मंत्री अब्दुल सत्तार देखील सामील होते. सत्तार देखील हिंदुत्वासाठीच बंडखोरांसोबत गेले का, असे खोचक प्रश्न विचारण्यात येत होते. सत्तार यांचे नाव नव्या मंत्रींडळाच्या यादीतून वगळल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील अनेक नेते मंत्रीपदासाठी लॉबिंग करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले असून सत्तार देखील त्यासाठीच गेल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तार हे मंत्री होते मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री होणार का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे जे निर्णय घेतात, त्यांना त्यात अनेक अडचणी येतात.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. सहाजिकच या मंत्रीमंडळात संख्याबळानुसार भाजपचं वर्चस्व राहणार असल्याचं स्पष्ट आहे. तर सत्तार हे शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे सत्तार यांना मंत्रीपद मिळणार की नाही, यावर तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र मंत्रीमंडळाच्या यादीतून नाव वगळल्याची कुणकुण सत्तार यांना लागल्यामुळेच ते दिल्लीत दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.