जळगाव प्रतिनिधी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तापदी विवेक फणसाळकर यांची वर्णी लागली. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी हे निर्देश दिले असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील सर्व पोलीस कार्यालयांमध्ये मराठीतून कामकाज करण्याचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत.
कार्यालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा सर्वाधिक उपयोग करण्यात यावा तसेच एफआयआर, आरोपपत्र आणि अहवाल हा मराठीतूनच तयार करण्यात यावा, असे आदेश पोलीस आयुक्तांनी मुंबईतील सर्व पोलीस कार्यालयांना दिले आहेत. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी हे निर्देश दिले असल्याची माहिती आहे.
मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत कडक निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्तांना पाठवला जाणारा रिपोर्ट हा मराठीत असावा. नॉन मराठी अधिकाऱ्यांनी मराठीत संवाद साधावा. मराठी भाषा व्यवस्थित शिकून घ्यावी. सर्व अहवाल मराठीत पाठवावे, असे निर्देशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी सर्व कारणार मराठीतच करणार असल्याचं सांगितलं आहे.