जळगाव : प्रतिनिधी
ट्रक लावून घरी पायी परतत असताना भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी झालेले चालक मोहंमद मुसा शेख (५९, रा. तांबापुरा) यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. मोहंमद मुसा शेख यांनी २५ एप्रिल रोजी, एमआयडीसी परिसरात ट्रक लावला व मुलाला घेण्यासाठी बोलविले. ते रस्त्याने पायी घरी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.
अपघातानंतर तेथे मोठी गर्दी झाली होती. मुलगा दुचाकी घेऊन त्यांना घेण्यासाठी जात असताना त्याला ही गर्दी दिसली व काय झाले म्हणून पाहण्यासाठी थांबला. मुलाला वडिलांचाच अपघात झाल्याचे दिसले. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा दि. २७ रोजी सकाळी मृत्यू झाला.



