Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
    क्राईम

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    editor deskBy editor deskApril 27, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क चौफुलीवर सोमवारी सकाळी भीषण अपघात घडून एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ओम सुनील गिरी (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ओम गिरी हा आपल्या दुचाकीने मानराज पार्क चौफुलीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ओम ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.

    दरम्यान, भररस्त्यात अपघात झाल्यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील दुतर्फा वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. मृत ओम गिरी हे जळगाव जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष रवींद्र गिरी यांचे पुतणे असल्याचे समजते. या घटनेमुळे गिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    दरम्यान, मानराज पार्क चौफुलीवर वारंवार अपघात होत असल्याने संतप्त नागरिकांकडून या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल तसेच जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकारणातली पातळी घसरली? वडेट्टीवारांच्या टीकेवर रवी राणांचा संताप; नवनीत राणांवरून वाद पेटला

    April 27, 2026

    स्वातंत्र्य चौकात खळबळ; कॅन्टींगजवळील स्टोअर रूमला आग !

    April 27, 2026

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.