जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात करगावात एका 11 वर्षीय चिमुकलीवर महिनाभरात अनेकवेळा सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ नराधमांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.
नागपूर शहरापासून 60 किमी अंतरावर असलेल्या गावात 19 जून ते 15 जुलै दरम्यान या घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.पीडितेचे आई-वडील मजूर असून करगावकर हे अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतात. 19 जून रोजी करगावकर हा मुलीच्या घरी गेला. त्याने मुलीला आपल्या सोबत घरी येण्यास सांगितले. त्यानंतर मुलगी कारगावकरसोबत त्याच्या घरी गेली, जिथे त्याने आणि त्याचा मित्र मुरस्कर यांनी मुलीवर बलात्कार केला.”आरोपीने मुलीला काही पैसे दिले आणि त्याबद्दल कोणालाही सांगू नका असे सांगितले. यांच्या सह आणखी 3 नराधमांनी बलात्कार केला.
रोशन करगावकर (29) आणि त्याचे मित्र/परिचित गजानन मुरस्कर (40), प्रेमदास गाठबांधे (38), राकेश महाकाळकर (24), गोविंदा नाटे (22), सौरभ उर्फ करण रिठे (22) , नितेश फुकट (30), प्रद्युम्न करूटकर (22) आणि निखिल उर्फ पिंकू नरुळे (24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.काही दिवसांनंतर करगावकर यांच्या ठिकाणी आणखी तिघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्याने सांगितले की, 15 जुलै रोजी मुरस्कर, गाठबांधे आणि त्याच्या दोन मित्रांनी मुलीला धमकी देऊन लैंगिक अत्याचार केले. पोलिस अधिकारीने ही माहिती सांगितली आहे. संबंधित नराधमावर गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.