लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नव्या पदांची नियुक्ती नुकत्याच जाहीर करण्यात आले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ही शिवसेनेच्या प्रवक्ते पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. इतकंच नाही तर शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्रंही आज देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. सत्ता गेली पण आता पक्षही हातचा जातो का अशी परिस्थिती सध्या झाली आहे. खरी शिवसेना कुणाची? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. अशापरिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का दिलाय. शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नव्या पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
एवढंच नाही तर शिंदे यांच्याहस्ते ही पदाचे नियुक्तीपत्रंही आज देण्यात आले आहे. शिंदे यांच्याकडून कोणत्या नेत्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आली आहे.
कुणाला कोणतं पद ?
किरण पावसकर – शिवसेना सचिव
गुलाबराव पाटील – प्रवक्ते
संजय मोरे – शिवसेना सचिव
दीपक केसरकर – मुख्य प्रवक्ते
उदय सामंत – प्रवक्ते
किरण पावसकर – प्रवक्ते
शीतल म्हात्रे – प्रवक्ते
डॉ. बालाजी किणीकर – खजिनदार