अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मारवड येथील रहिवासी गौरव सुरेश पाटील (वय ३०) या तरुणाने ९ रोजी सकाळी आपल्या राहत्या घरी घराच्या छताला साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव पाटील यांचे वडील सुरेश पाटील हे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना गौरवने घरातील मागच्या खोलीत गळफास घेतला. हे समजताच शेजाऱ्यांच्या मदतीने त्यास खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांस मृत घोषित केले. या प्रकरणी विजय भदाणे यांनी मारवड पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉ. शरीफ पठाण करत आहेत. दरम्यान, मयत गौरवचे वडील सुरेश पाटील हे मूळचे चिंचोली येथील असून मारवड येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. तर, डॉ. साठे म्हणून ते परिचित होते. तर गौरवचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह होऊन तो मारवड येथील संस्थेत नोकरीस लागला होता. तर, त्यांची पत्नी ४ महिन्यांची गर्भवती असता त्याने आपले जीवन संपवल्याने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.



