जळगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून वाढदिवसाच्या दिल्यात शुभेच्छा.त्यामुळे त्यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरुआहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील शिवसैनिकांची गर्दी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी हजर झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देताना,उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. . शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख नसल्याचे स्पष्ट केले आहे. या शुभेच्छा खोचकपणे दिली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला. एकनाथ शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंता उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न करता ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री’ असा केला आहे.
शिंदे यांनी केलेल्या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे. शिंदे यांच शिवसेना पक्ष प्रमुख होण्याचे स्वप्न आहे. कारण, शिंदे यांनी सेनेचे सर्वप्रथम ४० आमदार फोडले. त्यानंतर आता १२ खासदारही फोडले आहेत. परिणामी, विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे गटनेते पद गेले आहे. शिवाय शिंदे गटाने थेट निवडणूक आयोगाकडेच धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हाची मागणी केली आहे.