भारतीय हवामान विभागानं पुणे जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन दिवस पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याभरात दमदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळ जवळ एक हफ्ता विश्रातीनंतर पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यासह मराठवाडा आणि घाट परिसरातदेखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्यभरात दमदार पावसानं काहजेरी लावली. मुसळधार पावसाळामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान जून महिन्यात राज्यातील इतर भागांप्रमाणेच पुणे जिल्हातसुद्धा पावसानं पाठ फिरवली होती, मात्र जुलै महिना सुरु होताच पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली.
काही दिवसांच्या दमदार बॅटींगनंतर पावसानं एक आठवडाभर विश्रांती घेतली होती, मात्र आता पुन्हा पुणे शहरासह जिल्ह्याभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार दि. 23 जुलैपासून पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा दिला आहे