Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बोदवडमध्ये जमीन प्रकरण पेटले; एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध गुन्हा दाखल
    क्राईम

    बोदवडमध्ये जमीन प्रकरण पेटले; एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskMarch 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी 

    जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील मानपुर येथील जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात तसेच राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सन २००२ मध्ये मानपुर शिवारातील महार वतनाची गट क्रमांक १२२ ही जमीन खरेदी करण्यात आली होती. साखर कारखाना उभारण्याच्या उद्देशाने ही जमीन घेतल्याचे सांगण्यात आले होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीनमालक चमेलीबाई तुकाराम तायडे यांच्या वारसांना योग्य मोबदला देण्याचे तसेच साखर कारखान्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

    मात्र, कालांतराने साखर कारखाना उभारण्यात आला नाही. उलट, ही जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असल्याचे पुढे आले. त्यामुळे तक्रारदारांनी आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू करण्यात आली आणि त्यानंतर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यात फसवणूक तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलमे लावण्यात आली आहेत.

    दरम्यान, पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. या प्रकरणात पुढे कोणती तथ्ये समोर येतात आणि चौकशीचा निष्कर्ष काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘इस्रो शास्त्रज्ञ’ बनून महिलांची फसवणूक; २१ वर्षीय तरुणाचा भंडाफोड !

    March 30, 2026

    कोल्हे हिल्स परिसर चोरट्यांचा धुमाकूळ : लाखोंचा मुद्देमाल लंपास !

    March 30, 2026

    धक्कादायक : भरधाव डंपरने चिरडले, वृद्ध जागीच ठार !

    March 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.