Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘इस्रो शास्त्रज्ञ’ बनून महिलांची फसवणूक; २१ वर्षीय तरुणाचा भंडाफोड !
    क्राईम

    ‘इस्रो शास्त्रज्ञ’ बनून महिलांची फसवणूक; २१ वर्षीय तरुणाचा भंडाफोड !

    editor deskBy editor deskMarch 30, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी मुंबई : वृत्तसंस्था 

    नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच नवी मुंबईतून आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. स्वतःला इस्रोचा शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या २१ वर्षीय आदर्श म्हात्रेला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे ऑनलाइन माध्यमांतून महिलांना लक्ष्य करून होणाऱ्या फसवणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श म्हात्रे हा केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला आहे. मात्र, त्याने अत्यंत चलाखीने मॅट्रिमोनी वेबसाइट्सवर तब्बल १२ बनावट प्रोफाइल तयार केले होते. वेगवेगळ्या नावांनी ओळख निर्माण करत तो उच्चशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना लक्ष्य करत असे. स्वतःचे व्यक्तिमत्त्व प्रभावी दाखवण्यासाठी महागडे कपडे, खोटे कागदपत्रे आणि आकर्षक जीवनशैलीचा तो वापर करत होता.

    फसवणुकीची त्याची पद्धतही अत्यंत नियोजनबद्ध होती. सुरुवातीला तो स्वतःला इस्रोचा शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा बँक अधिकारी असल्याचे सांगून महिलांचा विश्वास संपादन करत असे. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत जवळीक निर्माण केली जाई. विश्वास दृढ झाल्यानंतर तो संबंधित महिलांशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे शोषण करत असे. विविध कारणे सांगत त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळल्याचे तपासात उघड झाले आहे.

    या प्रकरणाची व्याप्ती केवळ नवी मुंबईपुरती मर्यादित नसून राज्यातील अनेक शहरांपर्यंत पोहोचली आहे. नवी मुंबईसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर येथेही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी वारंवार आपली ओळख बदलत असल्यामुळे अनेक महिलांना तो सहज फसवण्यात यशस्वी ठरला.

    दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचे काही धागेदोरे पुण्यातही सापडले आहेत. त्यामुळे पुढील तपासासाठी पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून, त्याच्या संपर्कात आलेल्या महिलांची संख्या आणि फसवणुकीची एकूण रक्कम याचा सखोल तपास सुरू आहे.

    या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन ओळखी करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, त्यांच्या माहितीस पडताळणी करावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बोदवडमध्ये जमीन प्रकरण पेटले; एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध गुन्हा दाखल

    March 30, 2026

    कोल्हे हिल्स परिसर चोरट्यांचा धुमाकूळ : लाखोंचा मुद्देमाल लंपास !

    March 30, 2026

    धक्कादायक : भरधाव डंपरने चिरडले, वृद्ध जागीच ठार !

    March 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.