Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा तस्करीवर घाव; पोलिसांच्या सापळ्यात वाहनासह आरोपी जेरबंद
    क्राईम

    मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा तस्करीवर घाव; पोलिसांच्या सापळ्यात वाहनासह आरोपी जेरबंद

    editor deskBy editor deskMarch 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    मध्य प्रदेशातून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूक होत असून मुक्ताईनगर पोलिसांनी २६ रोजी रात्री कारवाई करुन जवळपास अडीच लाखांचा गुटखा पडकला आहे.

    जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात अवैधरित्या गुटख्याचा साठा व अवैधरित्या होणारी वाहतूक पुर्णतः थांबवण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने २६ मार्चला रात्री ९ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाटा ते सुकळी गावादरम्यान राशा बर्डाजवळ अनिकेत शिवाजी सुरवसे (वय ३५, रा. सावरगांव पोस्ट नारी, ता. बार्शी, जि. सोलापुर) हा एका वाहनातून २ लाख ४३ हजार ३६० रुपयांचा केसरयुक्त विमल पानमसाला व व्ही-१ तंबाखूचा गुटखा घेवून जात होता. हा गुटख्याचा साठा मुक्ताईनगर पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी ४ लाखांची चारचाकी (एमएच १४, डिएक्स- १४६३) व ५ हजारांचा मोबाईल असा एकूण ६ लाख ४८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनात पो. नि. आशिष आडसूळ, उपनिरीक्षक नीलेश गोसावी, पो.हे.कॉ. भाऊराव घेटे, पो.ना. असिम तडवी, पो.कॉ. प्रशांत चौधरी व जवाहर पवार यांच्या पथकाने केली. या प्रकरणात अन्न सुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रसंगी महसूल विभागाचे कर्मचारी किरण बावस्कर, कृष्णा माळी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव मनपा स्वीकृत सदस्यपद छाननीत भाजपचे तीन उमेदवार पात्र; दोन अर्जांवर तांत्रिक पेच

    March 28, 2026

    चुकून गोळी सुटल्याने अमळनेरात तरुण ठार !

    March 28, 2026

    मुक्ताईनगरजवळ मध्यरात्री दुर्घटना; चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस-ट्रकची जोरदार टक्कर

    March 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.