Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोपड्यात मोठा गुन्हा टळला; पिस्तूल-काडतूसांसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात!
    क्राईम

    चोपड्यात मोठा गुन्हा टळला; पिस्तूल-काडतूसांसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात!

    editor deskBy editor deskMarch 20, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    चोपडा शहर पोलिसांनी आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीचा मोठा डाव उधळून लावत मध्यरात्री थरारक कारवाईत पाच जणांना अटक केली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन संशयितांना पसार होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधाराचा फायदा घेत ते फरार झाले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस नियमित गस्तीवर असताना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास एका कारमध्ये पाच जण बसलेले दिसले, तर दोन जण बाहेर उभे राहून चर्चा करत होते. पोलिसांची चाहूल लागताच बाहेरील दोघे पळून गेले; मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत कारमधील पाच जणांना ताब्यात घेतले.

    आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या जवळ दरोड्याची सविस्तर तयारी आढळून आली. पोलिसांना गावठी पिस्तूल (कट्टा), जिवंत काडतूस, धारदार चाकू, दोरी, स्क्रू ड्रायव्हर, टॉर्च तसेच डोळ्यात टाकण्यासाठी मिरचीपूड मिळून आली. यावरून ही टोळी मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.

    अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अंगद जाधव (२१), रविंद्र गायकवाड (३२), विशाल पुंडे (२०), डिगंबर पवार (३३) आणि हरिदास शिरसाठ (४०) यांचा समावेश आहे. फरार झालेल्या दोघांपैकी एकाचा मोबाईल क्रमांक पोलिसांच्या हाती लागला असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.

    या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस, संशयितांची कार, पाच मोबाईल फोन आणि इतर साहित्याचा समावेश आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), आर्म अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदिवसा मिरचीपुड टाकून ५.२७ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार जेरबंद !

    March 20, 2026

    हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !

    March 20, 2026

    वाळू माफियांचा धिंगाणा; महसूल पथकावर हल्ला, अधिकारी जखमी

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.