Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भल्या पहाटे पोलिसांची कारवाई : बांभोरीत ४० वाहनांवर धाडसी कारवाई !
    क्राईम

    भल्या पहाटे पोलिसांची कारवाई : बांभोरीत ४० वाहनांवर धाडसी कारवाई !

    editor deskBy editor deskFebruary 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात पोलिस दलाने भल्या पहाटे कारवाई करत ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर व ट्रक जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी (२७फेब्रुवारी) पहाटे पाच वाजेपासून बांभोरी (ता. धरणगाव), टाकरखेडा, खेडी व परिसरामध्ये करण्यात आली, जप्त वाहने पोलिस मुख्यालय परिसरात लावण्यात आली आहेत. या वाहनांमध्ये मात्र वाळू आढळलेली नाही. पहाटेच पथक गावात पोहोचले व अचानक झालेल्या या कारवाईने गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाहून ग्रामस्थांनाही काय सुरू आहे, हे काही वेळ समजले नाही.

    जळगाव जिल्ह्यातील गिरणा व तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतो. या वाळू उपशाला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कारवाई हाती घेण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी पहाटे पाच वाजताच पोलिस पथक बांभोरी गावात पोहोचले व कारवाई सुरू केली.

    एरव्ही वाळू वाहतूकदार सुसाट वेगाने वाहने चालवित असतात. यामुळे अनेक वेळा अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. त्यात शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाई वेळी जप्त केलेली वाहने पोलिस नेत असताना सुध्दा ही वाहने भरधाव वेगाने चालवित नेली. यामुळे अनेक दुचाकीस्वारांना रस्त्याच्या कडेला उतरावे लागल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. वाळू उपसा रोखण्यासाठी जी वाहने जप्त केली आहे, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात असून त्यांच्याकडे वाळू वाहतूक परवाना आहे का, नसेल तर त्यांच्यावर वाळू वाहतुकीविषयी गुन्हे दाखल आहे का, याची खात्री करण्यात आली. तसेच कागदपत्रे नसलेल्या वाहनांवर कारवाईविषयी प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र दिले.

    ट्रॅक्टर, ट्रक, डंपरमधून वाळू वाहतूक होत असल्याने वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी गावातील ही वाहने जप्त करण्याच्या उद्देशाने गावातून तब्बल ४० वाहने जप्त करण्यात आली. गावात फिरुन एक-एक करता ३२ ट्रॅक्टर, ८ ट्रक, डंपर पथकाने जप्त केले. पहाटे पाच वाजेपासून कारवाई सुरू झाल्यानंतर सकाळी १० वाजेपर्यंत ती पूर्ण करण्यात आली.

    गावात अनेक जण झोपलेले असतानाच पथकाने कारवाईला सुरूवात केली. दिवस उजडलेला नव्हता त्या वेळी पथक गल्लीबोळातून फिरत होते व जेथे ट्रॅक्टर, टक, डंपर दिसले त्याची चौकशी करुन ते ताब्यात घेण्यात आले. वाहनांवर कारवाई करण्यापूर्वी ज्या वाहनांवर वाळू वाहतुकीचे गुन्हे दाखल आहे, अशा वाहनांचा शोध घेण्यात आला. तसेच ज्या वाहनांमधून वाळू वाहतूक होण्याची शंका आहे, अशा वाहनांवर कारवाई सुरू केली. जी संशयास्पद वाहने आहे, त्या वाहनांवर जप्तीची कारवाई करते वेळी वाहने सुरू करण्यासाठी चाव्या तयार करणाराही सोबत होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026

    पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक

    February 28, 2026

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.