Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !
    क्राईम

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskFebruary 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी 

    मोठे वाघोदा येथे पायी चालत असलेल्या युवकाला भरधाव मोटारसायकले धडक दिली या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. मृताचे नाव उदय प्रभाकर पाटील (वय ४४, रा. मोठे वाघोदा, ता. रावेर) असे आहे.

    उदय पाटील सोमवारी रस्त्यावर वाघोदा-सावदा हॉटेलजवळ फेरफटका मारत असताना मोटारसायकने (एमएच १९ एबी ८४१०) जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी सावदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

    या प्रकरणी हर्षल प्रभाकर महाजन (वय ३७, रा. वाघोदा बुद्रुक) यांनी सावदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार मोटारसायकल चालक संजय बावस्कर (रा. रोझोदा, ता. रावेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघतात मोटारसायकलस्वारही जखमी असून. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उदय पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    कुंभमेळ्याच्या नावाखाली ४००-५०० कोटींचा गंडा? ‘जामनेर कनेक्शन’चा पर्दाफाश; गिरीश महाजनांकडे तक्रार धडकताच यंत्रणा सतर्क!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.