Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरमध्ये राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई; बनावट मद्य कारखान्याचा पर्दाफाश, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
    अमळनेर

    अमळनेरमध्ये राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई; बनावट मद्य कारखान्याचा पर्दाफाश, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 14, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अमळनेर आणि चोपडा परिसरात मोठी कारवाई करत अवैध बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल ३ लाख १ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


    गुप्त माहितीच्या आधारे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जवखेडे-मांडळ रोडवरील एका विहिरीजवळ सापळा रचण्यात आला. अवैध मद्याची वाहतूक करताना भावलाल सुकदेव पारवे (रा. नवलनगर, धुळे) याला पकडण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर अमळनेर येथील धुळे रोडवरील आर. के. नगर भागात राहणाऱ्या दिनेश प्रभाकर खंबायत याच्या घरावर रात्री २१:१० वाजता छापा टाकण्यात आला. तेव्हा तो घरातच बनावट देशी-विदेशी मद्य तयार करताना रंगेहात सापडला.


    जप्त मुद्देमाल
    कारवाईदरम्यान दोन हिरो-होंडा मोटारसायकली (MH 18 CG 1549, MH 15 CA 0774), मॅकडॉल नं.१ च्या ४८ बनावट सीलबंद बाटल्या, १०५ लिटर तयार देशी दारू, मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या व बुच, तसेच मद्य सीलिंग मशीन, प्लास्टिक ड्रम, पाण्याचे जार, ट्रे, नळ्या आणि सुगंधी अर्क जप्त करण्यात आले.


    या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त साठ्यावरून आंतरराज्य मद्य तस्करांच्या मोठ्या जाळ्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


    ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उप-आयुक्त उषा वर्मा आणि अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक जी. एस. मोरे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    आमदाराच्या संपर्क कार्यालयात संशयास्पद बॅग; पोलिसांनी ताब्यात घेतले एअरगन

    February 14, 2026

    मध्यरात्रीचा भीषण अपघात; काळे कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू !

    February 14, 2026

    धक्कादायक : मध्यरात्री घरातून अल्पवयीन मुलीला पळविले !

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.