जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार किशोर आप्पा पाटील उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेत्याच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात तसेच सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, असे सांगून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.



