रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील निंभोरा बु., येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दसनूर फाट्यावर एका चारचाकी वाहनाला अपघात झाला. या अपघातग्रस्त कारमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात दीपक विलास चौधरी (वय १९, रा. निंभोरा) हा युवक शेतातील विहिरीत पडला. आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना दि. २८ रोजी रात्री ९:३० वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोदा ते निंभोरा रस्त्यावरील दसनूर फाटा येथे दीपक चौधरी आणि त्याचे मित्र सावदा येथून कार (एम.एच. १३ बी.एन. ९०९१)ने परत येत होते. त्यावेळी संस्कार प्रकाश चौधरी हा कार चालवत होता. कार अनियंत्रीत होऊन पलटली. त्यानंतर या कारमधून बाहेर येताना दीपक विलास चौधरी याचा शेतातील विहिरीत पडल्याने मृत्यू झाला तर संस्कार चौधरी, कुणाल शरद बारबंद, शुभम दत्तू दोडके, नितीन अरुण चौधरी, गणेश अशोक कुंभार यांना दुखापत झाली तसेच वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलिस ठाण्यात नथू रामभाऊ चौधरी यांनी दिलेल्या माहिती वरून निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.



