Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाळधीजवळ भीषण अपघात; आजोबा-नातू जागीच ठार !
    क्राईम

    पाळधीजवळ भीषण अपघात; आजोबा-नातू जागीच ठार !

    editor deskBy editor deskJanuary 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    नवीन कारच्या लकी ड्रॉमधील बक्षिसाची माहिती घेऊन परतत असताना भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिवसेनेचे तळई उत्राण गट प्रमुख देशमुख चुन्नीलाल राठोड (५५, रा. निपाणे तांडा, ता. एरंडोल) व त्यांचा नातू परेश दिनेश राठोड (६) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात राठोड यांच्या पत्नी बेबीबाई राठोड (५०) गंभीर जखमी झाल्या. हा अपघात रविवारी (२५ जानेवारी) दुपारी बायपासवर पाळधीनजीक सावदे–रिंगणगाव फाट्यावर घडला.

    मिळालेल्या माहितीनुसार,  निपाणे तांडा येथील देशमुख राठोड यांनी महिनाभरापूर्वी नवीन कार खरेदी केली होती. या कारच्या लकी ड्रॉमध्ये त्यांना बक्षीस लागले होते. त्याची माहिती घेण्यासाठी ते पत्नी बेबीबाई व नातू परेश याच्यासह दुचाकीने (क्र. एमएच १९, ईआर १६४२) जळगाव येथे आले होते. कारच्या शोरूममधून माहिती घेतल्यानंतर ते गावाकडे परतत असताना हा अपघात घडला.

    पाळधी परिसरात सावदे–रिंगणगाव फाट्यावर समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (क्र. एमएम ०५, एएम ३२४८) दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी पूर्णतः कंटेनरच्या खाली दाबली गेली. यात देशमुख राठोड व त्यांचा नातू परेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर बेबीबाई राठोड गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर तिघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहन व चालक पाळधी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहेत.

    मयत देशमुख राठोड हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक होते. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी रुग्णालयात भेट देत राठोड कुटुंबाचे सांत्वन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.