Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री गुलाबराव यांचा जलवा; प्रभाग 19 मध्ये शिवसेनेचा रेखा चुडामन पाटील बिनविरोध
    जळगाव

    पालकमंत्री गुलाबराव यांचा जलवा; प्रभाग 19 मध्ये शिवसेनेचा रेखा चुडामन पाटील बिनविरोध

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 2, 2026Updated:January 2, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील जळगाव – महापालिका निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा आपली संघटनशक्ती आणि रणनीती सिद्ध केली आहे. प्रभावी 19 मधून शिवसेनेच्या उमेदवार रेखा चुडामन पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून स्थानिक राजकारणात हा पक्षासाठी मोठा विजय मानला जात आहे. 

    या विजयामागे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांची आखलेली रणनीती महत्त्वाची ठरली आहे. दोन्ही नेत्यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवत विरोधकांना मैदानाबाहेर ठेवण्यात यश मिळवले. परिणामी, रेखा पाटील यांच्यासमोर असलेल्या एकमेव अपेक्षा उमेदवाराने अर्ज माघार घेतला मुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. 

    शिवसेनेने महापालिका निवडणुकीत आतापर्यंत चार उमेदवारांना बिनविरोध विजय मिळवून दिला आहे. या सलग यशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिनविरोध निवड ही केवळ उमेदवाराच्या वैयक्तिक प्रभावाचीच नव्हे तर पक्षाच्या संघटनशक्तीची आणि जनतेतील विश्वासाचीही साक्ष देते. 

    स्थानिक नागरिकांनीही या घडामोडीचे स्वागत केले असून शिवसेनेच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हा पक्षाच्या जनाधाराला अधिक बळकट करणारा ठरतो आहे. आगामी निवडणुकीत या बिनविरोध विजयांचा परिणाम निश्चितच दिसून येईल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. 

    शिवसेनेच्या या विजयामुळे विरोधकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पक्षाने बिनविरोधाचा धडाका लावल्याने महापालिका निवडणुकीतील पुढील टप्प्यांमध्येही शिवसेनेचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.