Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमडी ड्रग्सची साखळी उघड; राजस्थान–गुजरात–मध्य प्रदेशातून जळगावला पुरवठा
    क्राईम

    एमडी ड्रग्सची साखळी उघड; राजस्थान–गुजरात–मध्य प्रदेशातून जळगावला पुरवठा

    editor deskBy editor deskDecember 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ड्रग्स प्रकरणात पोलिस कोठडीत असलेला शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी हा राजस्थान, गुजरातच्या सीमावर्ती भागासह मध्य प्रदेशातून एमडी ड्रग्स आणून जळगाव शहरात त्याची विक्री करत असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील ड्रग्स पुरवठादार आणि मोठ्या माफियांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तपासाचा आवाका वाढवला आहे.

    शाहू नगर परिसरात शहर पोलिसांनी छापा टाकून साडेपाच लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. या प्रकरणात दहा महिन्यांपासून पसार असलेला शेख अबरार जिलानी याला २४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. अटकेनंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.

    दरम्यान, मालेगाव येथे झालेल्या कारवाईत अबरार जिलानीसह अरबाज खान मेहमूद खान उर्फ गबा (रा. मास्टर कॉलनी) हा पसार झाला होता. मात्र मालेगाव पोलिसांनी त्याला अटक केली असून, जळगाव पोलिसांकडून ड्रग्स प्रकरणातील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे.

    तसेच सुरत येथे झालेल्या स्वतंत्र कारवाईत इम्रान खाटीक यालाही अटक करण्यात आली आहे. त्यालादेखील पुढील चौकशीसाठी पोलिसांकडून ताब्यात घेतले जाणार आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी हे ड्रग्स राजस्थान व गुजरात राज्यांच्या सीमावर्ती भागातून तसेच मध्य प्रदेशातून आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

    तपासाचे धागेदोरे तीन राज्यांपर्यंत पोहोचल्याने आता पोलिसांकडून त्या भागातील सक्रिय ड्रग्स माफिया आणि साखळीचा शोध घेतला जात असून, लवकरच आणखी मोठ्या अटकांची शक्यता वर्तवली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मेहुणबारे पोलिसांचे यश; मोटरसायकल चोरी प्रकरणी आरोपी अटकेत

    January 20, 2026

    अमरावतीत खळबळ; भाजप नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

    January 20, 2026

    हळद, मेहंदी आणि कोरफड: नैसर्गिकरीत्या केस काळे करण्याचा सोपा फॉर्म्युला

    January 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.