Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव मनपा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग; चौथ्या दिवशी २४ अर्ज दाखल !
    राजकारण

    जळगाव मनपा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग; चौथ्या दिवशी २४ अर्ज दाखल !

    editor deskBy editor deskDecember 28, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून चौथ्या दिवशी प्रथमच अर्ज दाखलीच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. शनिवारी अनेक भाजप व अपक्ष उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

    भाजपच्या माजी महानगर अध्यक्षा उज्वला बेंडाळे, विरण खडके, सुरेखा तायडे, माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ज्योती चव्हाण, विश्वनाथ खडके, रंजना वानखेडे, विजय वानखेडे, गौरव ढेकळे, अनिता सुरेश भापसे, मनोज दयाराम चौधरी, मोहीत प्रेमकुमार बालाणी, शेख शाहिद शेख सादीक यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारांनी शनिवारी अर्ज दाखल केले.

    अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी, शनिवार दि. २७ डिसेंबर रोजी शहरातील १९ प्रभागांतून एकूण २३५ उमेदवारी अर्जाची विक्री झाली असून, त्यापैकी २४ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे चार दिवसांनंतर प्रथमच अर्ज दाखलीचा आकडा दोन अंकी गाठला आहे.

    नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असल्याने तसेच त्रुटी टाळण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार अंतिम दिवसांची वाट पाहत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अर्ज दाखल करण्याच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, जळगाव मनपा निवडणुकीची खरी रणधुमाळी आता सुरू होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

    अर्ज विक्रीच्या आकडेवारीवरून इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दि. २३ डिसेंबरपासून अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या दिवशी ७७७ अर्ज विकले गेले, मात्र एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी ६१८ अर्ज विक्री झाली तरी अर्ज दाखल झाले नाहीत. तिसऱ्या दिवशी ४२४ अर्जाची विक्री झाली असून केवळ एकच अर्ज दाखल झाला होता. चौथ्या दिवशी मात्र २४ अर्ज दाखल झाले आहेत. अवघ्या चार दिवसांत एकूण २,०५४ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे.

    शनिवारी झालेल्या अर्ज विक्री व दाखलीत प्रभागनिहाय चढ-उतार दिसून आले. प्रभाग क्रमांक ०१ मध्ये १० अर्जाची विक्री होऊन १ अर्ज दाखल झाला. प्रभाग क्रमांक ०३ मध्ये २६ अर्ज विक्रीसह २ अर्ज दाखल झाले. प्रभाग क्रमांक ०७ मध्ये २ अर्ज विक्री व १ अर्ज दाखल झाला. प्रभाग क्रमांक १२ मधून ११ अर्ज विक्री होऊन ३ अर्ज दाखल झाले. प्रभाग क्रमांक १३ मध्ये २३ अर्जाची विक्री झाली असून सर्वाधिक ४ अर्ज दाखल झाले आहेत.

    प्रभाग क्रमांक १५ मधून ७ अर्ज विक्रीसह ४ अर्ज दाखल झाले, तर प्रभाग क्रमांक १६ मध्ये १४ अर्ज विक्री होऊन तब्बल ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक १७ मध्ये २१ अर्ज विक्री होऊन १ अर्ज दाखल झाला, तर प्रभाग क्रमांक १८ मध्ये ८ अर्ज विक्री व २ अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित अनेक प्रभागांत अर्ज विक्री झाली असली तरी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अमरावतीत खळबळ; भाजप नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

    January 20, 2026

    हळद, मेहंदी आणि कोरफड: नैसर्गिकरीत्या केस काळे करण्याचा सोपा फॉर्म्युला

    January 20, 2026

    महापालिका यशानंतर भाजप आक्रमक; गोरे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस संतप्त

    January 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.