Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बसस्थानकात विद्यार्थ्यांचे मोबाईल लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद; तीन महागडे मोबाईल हस्तगत
    क्राईम

    बसस्थानकात विद्यार्थ्यांचे मोबाईल लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद; तीन महागडे मोबाईल हस्तगत

    editor deskBy editor deskDecember 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत विद्यार्थ्यांच्या पॅन्टच्या खिशातून मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. हमीद आयुब खान (वय २२, रा. मास्टर कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरी केलेले तीन महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आरोपीविरुद्ध यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे पावणे सहा वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानक परिसरात बसमध्ये चढताना निखिल राजू मानके (वय २०, रा. धानवड, ता. जळगाव), मयुर मांगू पाटील (वय २०, रा. चिंचखेडा, ता. जळगाव) यांच्यासह एका विद्यार्थिनीचा मोबाईल चोरट्याने हातचालाखीने लांबवला. चोरीचा प्रकार लक्षात येताच संबंधित विद्यार्थ्यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    एकाच वेळी तीन मोबाईल चोरीस गेल्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तातडीने तपास पथक तयार केले. महिला पोलीस हवालदार भारती देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील व नरेंद्र दिवेकर यांच्या पथकाने शोधमोहीम राबवली. या दरम्यान संशयास्पदरीत्या फिरत असलेला हमीद आयुब खान पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.

    कसून चौकशीत आरोपीने चोरी केलेले तीन मोबाईल काढून दिले. पुढील तपासात तो सराईत चोरटा असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे तरुणाचा खून; जवळच्या मित्रावर संशय

    January 14, 2026

    प्रभाग ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना भावनिक प्रतिसाद

    January 12, 2026

    प्रभाग क्र. ९ मध्ये मंत्री गुलाबराव पाटलांची भव्य महासभा

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.