Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साधूंच्या वेशात फसवणूक करणाऱ्या टोळीचा अमळनेरात पर्दाफाश; नागरिकांचा चोप !
    अमळनेर

    साधूंच्या वेशात फसवणूक करणाऱ्या टोळीचा अमळनेरात पर्दाफाश; नागरिकांचा चोप !

    editor deskBy editor deskDecember 26, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    दुकानदारांना विविध वस्तूंचा वास देऊन त्यांना वश करून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचा प्रकार करणाऱ्या चार साधूंच्या टोळीला पब्लिकने चांगलाच चोप देऊन पोलीस स्टेशनला जमा केल्यावर तेथेही ‘प्रसाद’ दिला. अमळनेरात २५ रोजी ४ ते ५ साधूंच्या वेशातील टोळी दाखल झाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, धुळे रोडवरील तुळजाई हॉस्पिटल परिसरातील समर्थ ट्रेडिंगचे संचालक जितेंद्र पाटील या दुकानाजवळ ४ जणांच्या साधूंच्या वेशातील टोळी आली अन् टिळा लावला. तर कशाच्या तरी सुगंधाच्या नावाखाली वा गुंगी आणणाऱ्या औषधाचा वापर करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनतर साधूने बळजबरी दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तसेच जितेंद्र पाटील यांच्या गल्ल्यात हात घातला. या प्रकारात त्यांच्याकडून ५ हजारांची रोख रक्कम तसेच इतर वस्तू हडप केल्यात. सुदैवाने लक्ष्मी प्रिंटिंगचे संचालक अतुल भदाणे आणि सनी पाटील, कार्तिक चौधरी, मेहुल चौधरी, शेषनाथ बागुल यांनी हा प्रकार पाहिला.

    त्यांनी तत्काळ जवळ जाऊन दुकानदाराला सावध केले. तर साधुंना पकडताच त्यांनी घेतलेले पैसे काढून दिले. तर ही माहिती कळताच लोक जमले अन् त्यांनी संधी साधूंना चोप दिला. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन संबंधित बहिरूपी साधूंना ताब्यात घेतले आणि चांगलाच ‘प्रसाद’ दिला. हे चारही साधू गुजरात येथील असल्याचे समजते. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहावे, अंधश्रध्येला बळी पडू नये, तर काही लोक फसवणूक करतात, नागरिकांनी संशय आल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे तरुणाचा खून; जवळच्या मित्रावर संशय

    January 14, 2026

    ‘अनेरच्या पुत्राचा’ लढा ठरला यशस्वी; जीवघेण्या पुलासाठी मानवाधिकार आयोगाचा प्रशासनाला ८ आठवड्यांचा निर्वाणीचा इशारा

    January 14, 2026

    प्रभाग ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना भावनिक प्रतिसाद

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.