Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : मुलगा घरी येताच दिसला वडिलांचा मृतदेह !
    क्राईम

    धक्कादायक : मुलगा घरी येताच दिसला वडिलांचा मृतदेह !

    editor deskBy editor deskDecember 1, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील नवनाथ नगर येथील घरी कोणीही नसतांना सुभाष मोतीराम पाटील (वय ५३ ) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठल नगरात सुभाष पाटील हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास होते. सर्वजण नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास कामावर निघून गेले होते. त्यामुळे सुभाष पाटील हे घरी एकटेच होते. दुपारच्या सुमारास घरी कोणीही नसतांना त्यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.

    सायंकाळी त्यांचा मुलगा घरी आला असता, त्याला वडील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. वडिलांचा मृतदेह बघताच त्याने एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहेकॉ जितेंद्र राठोड हे घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत सुभाष पाटील यांना मयत घोषीत केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहाटेचा भीषण स्फोट : गॅस सिलिंडर फुटून महिलेचा होरपळून मृत्यू; ९ जणांना नागरिकांनी वाचवले !

    June 20, 2026

    कीर्तन सुरू असतानाच काळाचा घाला; यशवाडी देवस्थानात भीषण दुर्घटना

    June 20, 2026

    पहाटेचा पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ऑपरेशन ड्रॉप केसमध्ये ८ आरोपी जेरबंद, ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त !

    June 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.