लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव महापालिकेत सोमवारी ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात सात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांनी दिली.
शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका आयुक्त स्तरावर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यात नागरीकांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण १५ दिवसांच्या आत निवारण करण्याच्या सुचना दिल्या आहे. त्या अनुषंगाने सोमवारी ४ जुलै रोजी जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत लोकशाही दिनाचे आयोजन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी एकुण ७ तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले. यात सार्वजनिक बांधकाम विभागासाठी २ अर्ज, अतिक्रमण विभागासाठी १ अर्ज, नगर रचना विभागासाठी ३ अर्ज आणि आरोग्य विभागासाठी १ तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, महसुल उपायुक्त प्रशांत पाटील यांच्यासह सर्व विभागातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.