मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ९६ लाख बोगस मतदार भरले आहेत. आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो प्रश्न विचारतोय सत्तधारी पक्ष का रागावतो आहे. कशा पद्धतीच राजकारण सुरु आहे हे सर्वाना माहिती आहे. राज्यातील स्थानिक पक्ष संपविण्याचे कारस्थान सुरु आहे. तुम्ही मतदान करा किंवा नका करू मॅच फिक्स आहे. ही कोणत्या पद्धतीचे लोकशाही आहे, अशात निवडूक होणार असेल तर कशाला प्रचार करायचा, कशाला पैसा खर्च करायचा, अशा शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. मुंबई- गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये मनसे पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षांचा गुलाम नाही. कित्येक र्षांपासून मतदारयाद्यांमध्ये घोळ सुरु आहे. याप्रश्नी आम्ही यापूर्वीही आवाज उठावला होता. विधानसभा निवडणूक झाली तेव्हा सत्ताधार्यांचे २३२ आमदार निवडणुन आले. एवढे आमदार निवडून आले तरी जल्लोष नाही. कारण निवडणूक आलेले आमदारही आवाक झाले. त्यांनाही कळेला आपण कसे निवडून आलो. कारण सारे काही फिक्स होते.
नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या भाषणाचा व्हिडिओही राज ठाकरे यांनी दाखवला. त्यावेळीही नरेंद्र मोदी हे निवडणूक आयोगला म्हणत होते की, तुम्ही सत्ताधार्यांचे गुलाम नाही. आम्हीही आता तेच सांगतोय. सत्ताधारी आमदार स्वतः सांगतो मी बाहेरून वीस हजार लोकांचे मतदान आणले, असे सांगत त्यांनी भुमरे यांचाच व्हिडिओ दाखवला. ते महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान करत आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले.
बोगस मतदार भरलेले आहेत, असे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगत आहेत. सगळीकडेच आम्हाला केवळ सत्ता पाहिजे आहे म्हणून सर्व काही सुरु आहे, असा आरोप करत भाजपला जी मराठी माणसे मतदान करतात त्यांना सांगायचं आहे की, वरवंठा फिरवू द्यायचे नाही नाहीतर त्या वरवंठा खाली तुम्हाला ही घेतील.मी प्रगतीच्या आड नाही मात्र मुंबईमध्ये महाराष्ट्रात होणारी प्रगती मराठी माणसाच्या थडग्यावर होतं असेल तर मी होऊ देणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. जोपर्यंत मतदान यादीमधील घोळ संपत नाही तोपर्यंत मतदान घेवू नका, असे माझे निवडणूक आयोगालासांगणे आहे. आता प्रत्येकाने कुठे कुठे जायचे आहे ते योग्य वेळ आली की सांगणार, असेही राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांना सांगितले.


