Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विदगाव पुलावर भीषण अपघात : अवैध वाळूच्या डंपरने घेतले आई-मुलाचे बळी, दोन गंभीर जखमी
    क्राईम

    विदगाव पुलावर भीषण अपघात : अवैध वाळूच्या डंपरने घेतले आई-मुलाचे बळी, दोन गंभीर जखमी

    editor deskBy editor deskOctober 1, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी


    जळगाव-चोपडा मार्गावरील तापी नदीवरील विदगाव पुलावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने कारला दिलेल्या भीषण धडकेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, वडील आणि दुसरा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रविवारी (३० सप्टेंबर) रात्री उशिरा घडली. चौधरी कुटुंब कारमधून चोपडा येथे जात असताना मागून आलेल्या डंपरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेमुळे कार पुलावरून थेट खाली नदीपात्रातील वाळवंटात जाऊन कोसळली.

    या अपघातात मीनाक्षी निलेश चौधरी (वय ३५) आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा पार्थ यांचा जागीच मृत्यू झाला. निलेश चौधरी आणि दुसरा मुलगा ध्रुव हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मयत मीनाक्षी चौधरी या जळगाव येथील शिक्षिका होत्या, तर त्यांचे पती निलेश चौधरी हे धानोरा येथील शिक्षक आहेत. त्यांच्या कुटुंबावर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय गायकवाड आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळी मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

    दरम्यान, अपघात करणाऱ्या डंपरविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे सातत्याने अपघात घडत असून, या बेकायदेशीर वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.