अमळनेर : प्रतिनिधी
झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून धरणगाव, एरंडोल व अमळनेर येथील १२ जणांना अटक करून त्यांच्याजवळून २ लाख ४२० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार टाकरखेडा शिवारातील कंडारी रस्त्यावरील गट नंबर १८० मधील समाधान धर्मा पाटील यांच्या शेतात पत्त्यांचा जुगाराचा अड्डा सुरू आहे. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक नामदेव बोरकर, संदीप धनगर, विनोद संदानशिव, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, गणेश पाटील, उज्ज्वलकुमार म्हस्के, प्रशांत पाटील, चरणदास पाटील, उदय बोरसे, राहुल पाटील, नरेश बडगुजर यांच्यासह छापा टाकला. त्यांच्याजवळून २ लाख ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांनाही अटक करण्यात आली असून अधिक तपास अमळनेर पोलिस करत आहेत.
समाधान धर्मा पाटील (४०, टाकरखेडा), पुंडलिक दोधू पाटील (४९, लहान माळीवाडा, धरणगाव), रवींद्र दशरथ महाजन (३३, नागोबा मढी, एरंडोल), चेतन उर्फ नाना ज्ञानेश्वर महाजन (२६, नागोबामढी एरंडोल), धनराज दिलीप पाटील (३५, कुंभारटेक तेलीवाडा, अमळनेर), सैनिक अशोक कोठारी (४०, वडचौक), पंढरीनाथ धनलाल माळी (५५, मोठा माळीवाडा, धरणगाव), पूनमचंद गोपीनाथ बाविस्कर (४०, माळीवाडा, धरणगाव), किशन किरण ओतारी (२५, कुंभारटेक, अमळनेर), केशव किरण पाटील (३५, निशाणे, ता. धरणगाव), किरण गुलाब पाटील (४२, लोणे, ता. अमळनेर), जितेंद्र रघुनाथ कोळी (४३, टाकरखेडा) यांना ताब्यात घेण्यात आले.


