• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

editor desk by editor desk
May 24, 2025
in क्राईम, जळगाव, रावेर
0
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

रावेर : प्रतिनिधी

गेल्या १० वर्षापूर्वी मुलाचा संसार उघड्यावर पडला. पहिल्या व दुसऱ्या नातवाची प्राणज्योत त्यांच्या बालपणीचं विझली. तिसरा नातू गोविंदा हा तरी वृद्धापकाळात आपली काठी ठरेल, ही आशा उराशी बाळगून असलेल्या आजोबांच्या आशेवरही क्रूर नियतीने पाणी फेरले. तिसरा नातू गोविंदाचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला आणि वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला. क्रूर नियतीच्या या क्रूर खेळाने वाघोडकर निःशब्द झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील वाघोड गावातील श्यामराव पाटील यांना चार मुले व मुलगी असा परिवार होता. सन १९८२ मध्ये पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर एका मुलाचाही मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा मुलगा वामन पाटील याला भुवनेश्वर व हर्षल ही दोन मुले झाली. या मुलांचा बालपणीच मृत्यू झाला. अकाली मृत्यूची श्रृंखला थांबत नाही तोच २०१५ मध्ये वामन याचा वयाच्या ४० वर्षी मृत्यू झाला. वामन याचा तिसरा मुलगा गोविंदा याने वडिलांच्या मृत्यूनंतर आजोबांच्या व आईच्या संगोपनाची धुरा सांभाळत शेती फुलवली. कालांतराने गोविंदा यांचे शाहपूर येथील नेहा हिच्याशी शुभमंगल झाले. त्यांना तीन मुले झाली.

सहा महिन्यांपूर्वीपासूनच गोविंदा याला मूत्रपिंडाच्या आजाराने घेरले. त्याची प्रकृती चिंताजनक होऊन गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गोविंदा उर्फ अनिल वामन पाटील यांचा वयाच्या ४० व्यावर्षी करुण अंत झाला.  दोन मुले आणि तीन नातवंडे यांचा डोळ्यासमोरच झालेला मृत्यू, यामुळे श्यामराव पाटील पूर्णतः खचले. गोविंदाच्या पार्थिवाला पाणी देताना हुंदके देत आपल्या वार्धक्यातील काठीचा आधार क्रूर नियतीने हिरावल्याने अश्रूना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी वाघोडचे वैकुंठधामही निःशब्द झाले होते.

Previous Post

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

Next Post

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

Next Post
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उज्वल निकम यांचा युक्तिवाद अन वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला !
Uncategorized

उज्वल निकम यांचा युक्तिवाद अन वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला !

July 22, 2025
‘शेतकरी नव्हे, शासन भिकारी’; कृषिमंत्री कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य !
कृषी

‘शेतकरी नव्हे, शासन भिकारी’; कृषिमंत्री कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य !

July 22, 2025
पुलाचे काम सुरु होताच शेतकऱ्यांचा आक्रोश ; आ.पाटलांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

पुलाचे काम सुरु होताच शेतकऱ्यांचा आक्रोश ; आ.पाटलांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

July 22, 2025
हनीट्रॅपमधील मोठा मासा मंत्रिमंडळात बसलेला  ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

हनीट्रॅपमधील मोठा मासा मंत्रिमंडळात बसलेला  ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

July 22, 2025
हायहोल्टेज ड्रामा : तो आला अन अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर लावला चाकू !
क्राईम

हायहोल्टेज ड्रामा : तो आला अन अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर लावला चाकू !

July 22, 2025
आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान :  आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही
राजकारण

आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान : आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही

July 22, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp