पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असताना आता एक खळबळजनक घटन पुण्यातील वारजे माळवाडी भागातून समोर आली आहे. शिवसेनेच्या युवासेना (शिंदे) जिल्हाप्रमुखाच्या वाहनावार गोळीबार करण्यात आला आहे. निलेश राजेंद्र घारे असे जिल्हाप्रमुखाचे नाव असून, सोमवारी मध्यरात्री त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या गोळीबाराच्या हल्ल्यात निलेश घारे यांना कुठल्याही स्वरुपाची हानी झालेली नाही, ते सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राजेंद्र घारे हे आपल्या घरी निघाले होते. दरम्यान, ते वारजे माळवाडी इथल्या गणपती माथा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील होते. कार पार्क केल्यानंतर त्यांच्या कारच्या मागच्या दरवाजाच्या काचेवर दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणाचा तपास वारजे पोलीस करत आहेत. निलेश घारे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख आहेत.