यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील डोंगरकठोरा शेत शिवारात डोंगरदे वस्तीच्या मागील शेतात केळीच्या पिकास पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला मात्र, प्रसंगवधान राखत शेतकऱ्यांने बिबट्याच्या तोंडावर माती फेकली व जोर जोरात आरडा ओरड केल्याने बिबट्या तेथुन पळाला, तर या बिबटयांने एक बकरी फस्त केलेली दिसुन आली आहे. बिबट्या सह एक त्याचे पिल्लू देखील सोबत असल्याने शेतकऱ्याने सांगीतले आहे. या घटनेनंतर डोंगरकठोरा परिसरात भिती पसरली असुन वनविभागास माहिती देण्यात आली आहे. वन विभागाकडून या शेत शिवारात विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांची गस्त सह टूप कॅमेरे लावण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरकठोरा ता. यावल येथील शेतकरी मनोहर बळीराम पाटील हे गुरूवारी नेहमीप्रमाणे आपल्या केळीच्या बागेला पाणी भरत होते. त्यांना बिबट्याने एका बकरीची शिकार केल्याचे दिसले. बकरी फस्त केलेल्या बिबटयाला पाहुन पाटील लगबगीने केळी बागातुन बाहेर पळू लागले असता बिबट्याचे एक लहान पिल्लूला ते धडकले व जमीनीवर कोसळले. यात आवाज झाल्याने बिबट्याने त्यांच्या दिशेने येत त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला असता पाटील यांनी प्रसंगवधान राखत बिबटयाच्या तोंडावर माती फेकली आणी जोर जोरात आरडा ओरड केली तेव्हा बिबट्या तेथुन पळून गेला. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. वनक्षेत्रपाल स्वनिल फटांगरे यांनी या भागात जावुन पाहणी केली तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने या भागात ट्रॅप कॅमेरे विविध भागात लावण्यात आले आहे. तर या भागात बिबट व त्याच्या पिल्लांचा वार असल्याचे उघड झाल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भिती पसरली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी बिबट्याला तात्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी केली आहे. डोंगरदे या पाड्या जवळ मेंढपाळ ठाकूर पावरा यांचे बकऱ्यांचे कळप आहे. तेथुन बिबट्याने बकरी पळवली होती व तिची शिकार केल्यानंतर केळीच्या बागात बिबट्या होता