Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : औरंगाबाद खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी !
    क्राईम

    खळबळजनक : औरंगाबाद खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी !

    editor deskBy editor deskApril 22, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक नेत्यांसह अभिनेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला धमकीचा मेल आल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा मेल चेन्नई येथून आल्याचे बोलले जात आहे. याबाबतची माहिती मिळताच औरंगाबाद उच्च न्यायालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. न्यायालयाच्या सर्व दरवाजांसमोर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच हा मेल कोणी पाठवला आहे, याबाबत पोलिस अधिकचा तपास करत आहे.

    अधिकची माहिती अशी, आज दुपारी 12 च्या सुमारास हा धमकीचा मेल आला होता. धमकीचा मेल आल्याची माहिती उच्च न्यायालय प्रशासनाने पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त डॉ. रणजीत पाटील, निरीक्षक कृष्णा शिंदे, हायकोर्ट सुरक्षाधिकारी कुंदन जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे शिवचरण पांढरे तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाचे चार पथके, एटीएसचे पथक खंडपीठात दाखल झाले.

    न्यायालयाच्या संपूर्ण परिसरात तपासणी सुरू असून, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत आणि प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच न्यायालयातील कामकाज देखील नियमित सुरू ठेवण्यात आले आहे. पोलिस यंत्रणा त्यांचे काम करत असून न्यायालयातील कामकाज तसेच ज्यांना न्यायालयात जायचे आहे अशांना देखील उपस्थित राहू दिले जात आहे. सायबर पोलिसांकडून धमकीच्या मेलची चौकशी सुरू आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘अजित पवार लहान भावासारखे’; नाना पाटेकरांची भावनिक आठवण !

    February 13, 2026

    ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारीचा आरोप; सदाभाऊ खोतांची जयंत पाटील यांच्यावर टीका

    February 13, 2026

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.