भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील देना नगर परिसरात १६ एप्रिल रोजी लहान मुलांमधील शाब्दिक वादाचे रूपांतर प्रौढांमधील – तुफान हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही गटांकडून बाजारपेठ पोलिसांत परस्पर तक्रारी दाखल झाल्या आहेत. दोन्ही बाजूंच्या मिळून १४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, मुन्नाबाई हंसराज पासी (वय ५८, रा. विश्वेश्वर मंदिराजवळ, भुसावळ) यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, नलिनीबाई सुरवाडे, किरण सुरवाडे, ललित नेमाडे, अनिल सोनवणे, छाया सोनवणे, शीतल सुरवाडे आणि चार अनोळखी व्यक्तींनी मिळून त्यांच्या सुनेला व मुलाला शिवीगाळ केली आणि मारहाण केली. यामध्ये त्यांच्या सुनेच्या दागिन्यांचे नुकसान झाले. या आधी पहिल्या गटातर्फे अन्य आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तेजस पारीसकर करीत आहेत