भुसावळ : प्रतिनिधी
येथील नाहाटा चौफुलीजवळ शनिवारी रात्री २ वा अॅसिडने भरलेला भरधाव वेगातील टँकर उलटल्याने त्याला लगेचच आग लागली. परंतु रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी मध्यरात्री २ वाजता जळगावहून नागपूरकडे जाणारा हा टैंकर नाहाटा कॉलेज चौफुलीजवळ उलटला. परंतु रात्रीची वेळ असल्याने समोरून व मागून येणारे वाहन नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा टँकर उलटताच त्याला लागलीच आग लागली रात्रीच्या वेळेस काही लोकांनी त्या टैंकर जवळ जाऊन पुढील काचा फोडून ड्रायव्हरला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. तसेच ट्रकला आग लागल्याने अग्निशमन व पोलिस स्टेशनला स्थानिक नागरिकांनी फोन लावून आग तातडीने विझवली. आगीमुळे रस्त्यात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. लगेचच नंतर रस्ता खुला करून देण्यात आला. ही आग आटोक्यात नसती तर मोठा अनर्थ झाला असता. घटनास्थळावरील एकाच्या माहितीनुसार ड्रायव्हरला झोप लागल्याने हा टँकर उलटल्याची घटना घडली. तर पोलिसांनी रात्री गस्तीच्या वेळेस ड्रायव्हरची तपासणी करायला हवी. त्यामुळे असे अपघात टळू शकतील, असे मत व्यक्त होत आहे.
काही महिन्यांपूर्वी राजस्थान येथे गॅसने भरलेला टँकर रात्रीच्या वेळी अपघात होऊन उलटून आग लागल्याने त्यात १२ लोकांचा जीव गेला होता तर त्याच्या मागील व पुढील ४० वाहने जळू खाक झाली होती. काही लोक लक्झरीमध्ये झोपेतच मरण पावले होते. त्यामुळे अॅसिड टैंकरला लागलेली आगही खूपच हानीकारक ठरू शकली असती.