• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी :छत्रपती संभाजीनगरात ८ संशयित बांगलादेशींवर गुन्हा !

editor desk by editor desk
April 9, 2025
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

राज्यातील काही भागात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवीत असल्याच्या घटना उघडकीस येत असतांना आता छत्रपती संभाजीनगर शहरात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवणाऱ्या व त्यासाठी अर्ज केलेल्या ८ संशयित बांगलादेशी घुसखोरांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा-२०२४ निवडणूक प्रचार व आचारसंहिता काळात माेठ्या प्रमाणावर बाेगस जन्म दाखले दिल्याचे समोर आले आहे. याची चाैकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आतापर्यंत अशी २ लाख २३ हजार प्रकरणे उघडकीस आली, अशी माहिती भाजपचे वरिष्ठ नेते किरीट साेमय्या यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी ८ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरात तहसीलदारांचे बनावट जन्म दाखले दिल्याप्रकरणी ४३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर दाेन वकिलांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पाेलिस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन तपासाची माहिती घेण्यासह सूचना देण्यासाठी मंगळवारी साेमय्या जळगावात आले हाेते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात २ लाख २३ हजार बाेगस दाखल्यांची प्रकरणे समाेर आली आहे. त्यात ९७ टक्के मुस्लिम आहेत. त्यातील ८०% प्रकरणात पुरावा म्हणून फक्त आधारकार्ड जाेडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यातील १० जिल्ह्यात १६ गुन्हे दाखल झाले आहेत. १७ वा गुन्हा मंगळवारी संभाजीनगरात दाखल होत आहे. बाेगस दाखल्यांप्रकरणी सिल्लोडला पोलिसांशी दीड तास चर्चा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या १० जिल्ह्यांमध्ये अशा बाेगस दाखल्यांचा प्रकार समाेर आल्याने केंद्रीय जनगणना संचालकांनीही पत्र देऊन त्याबाबतची माहिती राज्य सरकारकडून मागवली आहे.

छत्रपती संभाजीनगरातील बनावट जन्मनोंदी प्रकरणात बनावट कागदपत्रांवर जन्म दाखला मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ८ जणांविरोधात सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात मोहंमद जमील सिद्दिकी मोहंमद रशीद, मुजफ्फर अन्वर खान, नबी हबीब शेख, युनूस रफिक शेख, रिझवान खान अन्वर खान पठाण, सादिक हुसेन शेख, शाहेद सज्जाद शेख, मिर्झा अन्वर बेग अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी फेब्रुवारी २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले होते.

 

Previous Post

घरातून केली ५ लाखांची चोरी, संशयित अटकेत !

Next Post

खळबळजनक : वडिलांसह भावाने केला तरुणाचा खून !

Next Post
खळबळजनक : वडिलांसह भावाने केला तरुणाचा खून !

खळबळजनक : वडिलांसह भावाने केला तरुणाचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group