Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » करुणा मुंडेंच्या दाव्याने धनंजय मुंडें पुन्हा येणार अडचणीत !
    क्राईम

    करुणा मुंडेंच्या दाव्याने धनंजय मुंडें पुन्हा येणार अडचणीत !

    editor deskBy editor deskApril 5, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे अनेक अडचणीत आल्यानंतर आज पुन्हा एकदा वांद्रे स्थित कौटुंबिक न्यायालयाने मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. मुंडे यांनी या आदेशांना माझगाव कोर्टात आव्हान दिले आहे. या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांनी आपल्या लग्नाचे विविध पुरावे सादर करत आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला. पण मुंडे यांच्या वकिलांनी त्यांचा हा दावा धुडकावून लावला आहे. करुणा यांची मुले मुंडे यांची आहेत, पण त्या त्यांच्या पत्नी नाहीत, असा पुनरुच्चार त्यांनी यासंबंधी केला आहे.

    माझगाव कोर्टाने गत 29 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार करुणा यांनी आज आपल्या मुलांचे पासपोर्ट, जन्माचे प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज, विमा पॉलिसी आदी विविध दस्तऐवज कोर्टापुढे सादर केले. त्यानंतर आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला.

    दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी करुणा शर्मा यांनी सादर केलेल्या पुराव्यांचे कोणतेही महत्त्व नसल्याचे नमूद करत त्यांचा दावा धुडकावून लावला. धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मा यांच्याशी लग्न झाले नाही. कोर्टाने त्यांना आपल्या लग्नाचे पुरावे आणण्याचे आदेश दिले होते. पण त्यांनी वसियतनामा व स्वीकृतीपत्र वगळता इतर दस्तऐवज आणले. त्याला काही अर्थ नाही, असे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच करुणा शर्मा माझ्या पत्नी नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी तसे कागदपत्रेही कोर्टात सादर केली आहेत. करुणा यांनी सादर केलेल्या वसियतनाम्यातील उल्लेखावरून त्या मुंडे यांच्या पत्नी असल्याचे सिद्ध होत नाही. हा वसियनामाच खोटा आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे केवळ काही काळ त्यांच्यासोबत राहिले (लिव्ह इन रिलेशनशिप), पण त्या त्यांच्या पत्नी नाहीत, असेही सायली सावंत यावेळी म्हणाल्या.

    त्यानंतर करुणा यांच्या वकिलांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत आम्ही सादर केलेले पुरावे करुणा शर्मा यांचे मुंडेंशी लग्न झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे असल्याचा युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निकाल राखून ठेवला. कोर्ट पुढील 2-3 दिवसांत आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या वकिलांना काही मुद्यांवर चांगला युक्तिवाद करता आला नसल्याचे नमूद करत करुणा शर्मा यांनी काही मुद्यांवर स्वतःही युक्तिवाद केला. दुसरीकडे, करुणा शर्मा यांनी कोर्टाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल असा ठाम विश्वास केला. विशेषतः मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न करणाऱ्या व्यक्तीला धनंजय मुंडे यांनी 20 कोटींची ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

    करुणा शर्मा म्हणाल्या, कोर्टाचा निर्णय माझ्याबाजूने लागेल याची मला खात्री आहे. आम्ही कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांमुळे त्यांचे वकील हादरलेत. मी मुंडे यांची 1996 पासून पत्नी असल्याचे पुरावे सादर केलेत. माझ्याकडे रेकॉर्डिंगही आहे. ते आज काही कारणास्तव सादर करता आले नाही. त्यांनी तयार केलेले मृत्यूपत्र 2016 चे आहे. त्यावर त्यांची स्वाक्षरी व अंगठा आहे. त्यातही करुणा शर्मा आपली पहिली पत्नी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः लग्नाचे सर्टिफिकेट माझ्याकडे नसले तरी, ते राजश्री मुंडे (धनंजय मुंडे यांच्या पत्नी) यांच्याकडेही नाही. आमचे मंदिरात लग्न झाले होते. त्यामुळे कोर्ट मुंडे यांचा दावा फेटाळेल यात शंका नाही.

    धनंजय मुंडे यांनी मला रस्त्यावर आणले. मला हिरोईन होण्याची ऑफर होती, पण मी पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मला प्रेमात फसवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते. मला व माझ्या मुलांना नेहमी धमकी दिली जाते, असेही करुणा शर्मा यावेळी बोलताना म्हणाल्या.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.