Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कोरटकरला अटक अन दिली कबुली : हो मीच केला फोन !
    क्राईम

    कोरटकरला अटक अन दिली कबुली : हो मीच केला फोन !

    editor deskBy editor deskMarch 27, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आपणच फोन केला होता. तर मोबाईलमधील संपूर्ण डाटा आपण स्वतःहून डिलीट केला असल्याची कबुली प्रशांत कोरटकर याने पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. असे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे.

    दरम्यान प्रशांत कोरटकरने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आपण मंचरियाल येथून चेन्नईला जाणार होतो असेही पोलिसांना सांगितले आहे. कोरटकरला न्यायालयाकडून 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर बुधवारी त्याचे फॉरेन्सिक टीम कडून तपासणी करण्यात आले. तत्पूर्वी रात्रभर केलेल्या चौकशीत कोरटकरने कोल्हापूर पोलिसांना ही माहिती दिल्याचे वृत्त आहे.

    तब्बल महिनाभरापासून प्रशांत कोरटकर हा पोलिसांना गुंगारा देत होता. यानंतर कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकर याची चौकशी केली जात आहे. प्रशांत कोरटकर कुठे गेला होता, कोणाची मदत घेतली, कुठे किती दिवस राहिला, यादरम्यान कोणीकोणी मदत केली, असे प्रश्न पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला विचारले. त्यामुळे त्याला पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी मदत केली का देखील तपासले जात आहे. आरोपी प्रशांत कोरटकर यांने त्याच्या मोबाईल मधील डाटा डिलीट केला आहे. असे त्याने का केले? तसेच हा आरोपी एक महिना फरार होता. या काळात त्याला कोणी मदत केली? याचा देखील तपास करणे गरजेचे असल्याचा दावा सरकारी वकील यांनी न्यायालयात केला होता. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी मिळावी,अशी मागणी वकीलांनी केली होती. यातून पोलिस कोठडी देताच कोरटकरने कबुली दिली आहे.

    कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं टेक्निकल ईव्हीडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली, आता पुढची कायदेशीर कारवाई पोलिस करतील असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही हेच पोलिसांनी दाखवून दिलेले आहे. बीएनएसअंतर्गत जी कारवाई असेल ती कारवाई आता त्यांच्यावर होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.