Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा : हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची माहिती !
    क्राईम

    प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा : हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची माहिती !

    editor deskBy editor deskMarch 26, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. सरकारी उज्ज्वल निकम कोर्टात युक्तिवाद केला. संपूर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाइड केले, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर केला आहे. वाल्मीक कराडे या घटनेला गाईड केल्याचे सीडीआरमधून समोर आल्याचेही उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटले आहे. आजच्या सुनावणीदरम्यान आरोपींना व्हिसीद्वारे हजर करण्यात आले. दरम्यान, सुनावणी पार पडल्यानंतर अॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत सुनावणीबाबत माहिती दिली.

    संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी पार पडली असून या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात 8 आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

    प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून एका मोठ्या कटाचा परिपाक आहे. हा कट कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे, असा देखील दावा न्यायालयात केला. विशेषत: वाल्मीक कराडने ज्याप्रमाणे धमकी दिली, त्याप्रमाणे गँग लीडर सुदर्शन घुले तिथे प्रत्यक्ष आला. सुदर्शन घुलेने देखील धमकीचा पुनरुच्चार केला. या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरुपात आहेत, अशी माहिती सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.

    आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयात निवेदन

    हा कट दोन किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच, परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत. यातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचाही गुन्ह्यात सहभाग कसा आहे, याबाबत आम्ही न्यायालयाला विषद केले. काही महत्त्वाच्या साक्षीदारांची ओळख गोपनीय ठेवावी, अशी न्यायालयाला विनंती केली आहे. आरोपींची संपत्ती संघटीत गुन्हेगारी कायद्याखाली जप्त करावी, अशीही विनंती आज न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयात अर्ज केलेले आहेत, अशी माहिती वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

    पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी

    तपास अधिकारी आणि माझे सहकारी अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी आरोपींच्या वकिलांना लागणाऱ्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली. आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यांनुसार ही घटना 8 ऑक्टोबर 2024 पासून ते 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुखांची निर्घृण हत्या होईपर्यंत या घटनेची मालिका न्यायालयात विषद केली. प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमच्याजवळ पुरावा आहे. यातील संघटीत गुन्हेगारी कशी फोफावली गेली? आणि यातील म्होरक्या सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता, हे देखील न्यायालयात स्पष्ट केले. आरोपींना हवी होती, ती सर्व कागदपत्रे देण्यात आलेली आहे. सुनावणीची पुढील तारीख 10 एप्रिल ठेवली आहे. त्यादिवशी आम्ही न्यायालयाने आरोपींवर कोणकोणते गुन्हे करावेत, चार्ज फ्रेम करावा, याबाबतचा विनंती अर्ज देणार आहोत, असे अॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.