Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फडणवीसांचे सरकार हे मनोरुग्णांचे सरकार :  संजय राऊतांचा टोला !
    क्राईम

    फडणवीसांचे सरकार हे मनोरुग्णांचे सरकार :  संजय राऊतांचा टोला !

    editor deskBy editor deskMarch 22, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    महायुती व महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दंगल होते, प्रशांत कोरटकर नागपूरचा आहे. नागपूरलाच दंगल का झाली हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. फडणवीसांचे सरकार हे मनोरुग्णांचे सरकार आहे, त्यांच्यावर सामूहिक उपचार करण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

    संजय राऊत म्हणाले की, नागपूरचा प्रशांत कोरटकर हा त्यांचाच माणूस आहे. तो पळून गेला का नाही हे तेच सांगू शकतात. आपण म्हणायचो तो पळून गेला आणि तो भाजपच्या कार्यालयात असायचा किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा, भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकते. कोरटकर खरोखर पळून गेला असेल तर गृहखात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही. फडणवीसांचे पोलिस इतके सक्षम असताना त्यांना माहिती नसताना असे होऊच शकत नाही.

    संजय राऊत म्हणाले की, कृष्णा आंधळे, कोरटकर सापडत नाही. भाजपशी निगडीत काही आरोपी सापडत नाही. आरोग्य खात्यात प्रचंड गोंधळ असल्याने राज्यातील जनता पैसे जमाकरत या मनोरुग्ण सरकारवर उपचार करु शकते. ज्या दिवशी कोरटकरला हायकोर्टाने जामीन नाकारला तो नागपूरमध्ये होता. ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे. जर तो पळून गेला असेल तर नागपूर पोलिस आयुक्तांची बदली करावी नाहीतर राजीनामा घ्यावा. खरंतर गृहमंत्र्यांने यावर बोलले पाहिजे.

    संजय राऊत म्हणाले की, नागपूर दंगल घडवणारे सत्ताधाऱ्याचे लोकं आहेत. आमच्या सरकारच्या काळात दंगली घडल्या नाहीत. मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच दंगल घडली नाही. फडणवीसांसोबत उद्धव ठाकरे असताना दंगली घडली नाही. आता नागपूरला घडली त्याला जबाबदार कोण? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. हे दंगलखोर तुमचे आहेत. औरंगजेबाची कबर काढा सांगणारे मंत्रिमंडळात आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का? ते दंगलीला खतपाणी घालत आहे. फडणवीसांनी सामान्य लोकांवर कारवाई केली पण वातावरण तापवणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई का झाली नाही.

    संजय राऊत म्हणाले की, देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. हे जजच्या बंगल्यामध्ये 15 ते 16 कोटी रुपये सापडतात. त्यांना शिक्षा म्हणून केवळ त्यांची बदली केली. दुसऱ्याच्या घरात असे सापडले असते तर अमित शहांनी त्या व्यक्तीला कारागृहात पाठवले असते. पण भ्रष्ट न्यायमुर्तीच्या नेमणुका या भाजपच्सया दबावाखाली झाल्या आहेत. त्यांना हवे ती लोकं न्यायधीश करण्यात आली आहेत. मी यात महाराष्ट्राचे उदाहारण देऊ शकेल. संघ परिवारातील सदस्य कसे उच्च पदावर बसवले हे मला माहिती आहे पण मी न्यायव्यवस्थेवर बोलणार नाही.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.