Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीच्या पतीला संशय : चौघांनी केली प्रियकराची हत्या !
    क्राईम

    प्रेयसीच्या पतीला संशय : चौघांनी केली प्रियकराची हत्या !

    editor deskBy editor deskMarch 17, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धाराशिव : वृत्तसंस्था

    गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना आता एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे प्रेमसंबंधांची किंमत एका तरुणाला जीव गमवून चुकवावी लागली. भूम तालुक्यातील दुधोडी गावातील माऊली बाबासाहेब गिरी याला प्रेमसंबंधातून झालेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली. रविवारी (दि.१६) त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, माऊली गिरीचे आणि पांढरेवाडी येथील विवाहित तरुणीचे प्रेमसंबंध होते. ३ मार्च रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर झालेल्या  संभाषणामुळे हा प्रकार मुलीच्या पतीला कळला. संतापलेल्या पतीने माऊली याला भेटण्यासाठी पांढरेवाडी येथे बोलावले. तेथे मुलीच्या पतीसह तिचे वडील आणि इतर ४-५ जणांनी त्याला विवस्त्र करून लोखंडी रॉड आणि काठ्यांनी अमानुष मारहाण केली. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्याला रस्त्यालगत फेकून दिले.

    गंभीर जखमी अवस्थेत माऊली याला प्रथम जामखेड, नंतर सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. १४ दिवसांच्या उपचारांनंतर रविवारी सकाळी १०:३० वाजता त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.