Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : राज्यातील माजी खासदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न !
    क्राईम

    खळबळजनक : राज्यातील माजी खासदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न !

    editor deskBy editor deskMarch 9, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    जगभर महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यांना पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, उषा काकडे यांनी दुपारी ३.३० ते ४ दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला. उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. उषा काकडे या ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करतात.

    संजय काकडे हे सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते राज्यसभेचे माजी खासदार होते. अपक्ष खासदार म्हणून संजय काकडेंनी भाजपला केंद्रात पाठींबा दिला होता. संजय काकडे यांचे पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात समर्थक आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीत विजय काकडे यांची निर्णायक भूमिका असते. संजय काकडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत.

    पुणे जिल्ह्यातील मराठा चेहरा म्हणून संजय काकडे यांची ओळख आहे. संजय काकडे हे मूळचे बांधकाम व्यवसायिक आहेत. १९८६ पासून त्यांनी रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठं काम केलं आहे. ‘संजय काकडे ग्रुप’ या नावाने त्यांची कंपनी आहे. 2017 मध्ये संजय काकडे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी पुणे महानगर पालिकेची जबाबदारी दिली होती. तेव्हापासून त्यांची महाराष्ट्रभर ओळख झाली. काकडेंनी पुण्याचं स्वतःचे कौशल्य वापरुन भाजपला विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून त्यांची एक राजकीय अभ्यासक म्हणून ओळख निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पुन्हा एकदा जबाबदारी दिली. तीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. काकडे यांना बांधकाम क्षेत्रातील मोठा अनुभव असल्याने त्यांच्या सहकार्याने सरकारने टेंडर प्रक्रियेमध्ये अनेक बदल केले. काकडेंच्या अभ्यासू वृत्तीमुळे पुणे मनपाचे ८०० कोटी वाचल्याचा दावा केला जातो. संजय काकडे यांना पक्षाने राज्यसभेवर जाण्याची संधी दिली होती. त्या काळात त्यांनी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये पक्षासाठी काम केलं. मात्र मागच्या काही वर्षांपासून ते राजकारणापासून अलिप्त असल्याचं दिसून येतं.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.