Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला तहसीलदारांवर माफियांचा हल्ला !
    क्राईम

    महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला तहसीलदारांवर माफियांचा हल्ला !

    editor deskBy editor deskMarch 7, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जालना :  वृत्तसंस्था

    वाळू व मुरूम माफियांचा राज्यातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ सुरु असतांना आता महिला दिनाच्या पूर्वी जालना जिल्ह्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या पथकावर मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. यावेळी तहसीलदार प्रतिभा गोरे या देखील पथकासोबत होत्या. रात्री साडेबाराच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे समजते. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

    या प्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रतिभा गोरे यांच्या फिर्यादीनुसार, दिनांक 07/03/2025 रोजी मी माझे खाजगी वाहन क्र. MH.22.AW.9305 ने अवैध गौनखणीज उतखनन प्रतिबंधामक कार्यवाही करत असताना रात्री 12.50 वाजेच्या सुमारस इंदिरानगर परतुरच्या पुढे आबा रोडच्या डाव्या बाजुला एका जेसीबीने उतखनन करुन एका पाढऱ्या रंगाच्या हायवात भरताना दिसून आले. त्या दिशेने मी गेले असता हायवा व जेसीबी चालकाने जेसीबी घेऊन पळ काढला.

    मी माझ्या पथकातील व्यंकट दडंवाडसह महसुल अधिकारी गणेश काळे महसूल सेवकाच्या मोबाईलवर फोन करुन बोलवले तेव्हा मी पाठलग केला आसता पारडगाव रोडला जेसीबीचे टायर खराब झाल्याने जेसीबी थांबला तेव्हा मी जेसीबी ताब्यात घेतला. परतूर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना संपर्क साधून पोलिस पथक पाठवण्यास सांगितले.

    जेसीबीचे फोटो काढत असताना तेथे सहा ते सात लोक नामे 1) अखिल बिल्डर 2) इलियास कुरेशी 3) अमजत कुरेशी 4) इरफान युनुस शेख 5) जुनेद व इतर दोन अशा सहा ते सात लोकांनी माझ्या हातातील मोबाईल हिसकावला व शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व जेसीबी पळवून नेला. तसेच सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपीतांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सुनेत्रा पवारांनी सावध राहावे; राजकारणात धोके संभवतात – संजय शिरसाट !

    April 11, 2026

    मराठवाडा पुन्हा हादरला : हिंगोलीत 4.7 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांत भीती !

    April 11, 2026

    चांदी पॉलीशच्या बहाण्याने फसवणूक; सतर्क तरुणामुळे तिघे भामटे जाळ्यात

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.